होमपेज › Belgaon › व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह फोटो पाठवल्याने युवकाला अटक

व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह फोटो पाठवल्याने युवकाला अटक

Published On: Dec 08 2017 1:36AM | Last Updated: Dec 08 2017 12:10AM

बुकमार्क करा

निपाणी ः प्रतिनिधी

सोशल मीडियातून विशिष्ट धर्माबद्दल आक्षेपार्ह फोटो पाठवल्याबद्दल   राकेश गंगाराम माने (वय 20, रा.भीमनगर) या युवकाला निपाणी शहर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. 

राकेश माने हा माया भाई युवा मंच नामक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचा सदस्य आहे. त्याने विशिष्ट धर्माबद्दलचे आक्षेपार्ह चित्र बुधवारी  रात्री अपलोड केले. त्यामुळे समाजबांधवांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. गुरुवारी सकाळी  येथील शादीमहल ठिकाणी मोठ्या संख्येने युवक जमा होऊन त्यांनी  शहर पोलिस स्थानक गाठले. प्रभारी फौजदार निंगनगौडा पाटील यांनी त्यानंतर संदेश आलेल्या मोबाईलची शहनिशा करून  गुन्हा राकेशवर नोंदवला.

उपअधीक्षक अंगडी यांनी पोलिस स्थानकाला भेट देऊन  अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कारवाई करण्याची ग्वाही दिली.  

निपाणी अंजुमन मुस्लिम बोर्डिंगच्यावतीने उपअधीक्षकांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक जुबेर बागवान, इलियास पटवेगार, अन्वर बागवान, इकबाल झारी, इरफान महात, मैनुद्दीन मुल्ला, सरफराज कोल्हापुरे, शरीफ बेपारी, शेरू बडेघर, जाकीर कादरी, इम्रान नाईकवाडे, फारूक नगारजी, समीर पठाण आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.