Sat, Jul 20, 2019 02:10होमपेज › Belgaon › गांजा विक्री करणार्‍या चार जणांना अटक

गांजा विक्री करणार्‍या चार जणांना अटक

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 18 2018 11:52PMबेळगाव : प्रतिनिधी

अमली पदार्थ व गांजा विक्रीविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फशी पाडून गांजा विक्री करणार्‍या चौघांंना सीसीबी पोलिसांनी गँगवाडी येथे छापा टाकून अटक केली. 

गँगवाडी येथील दुर्गादेवी मंदिराशेजारी गांजा विक्री करताना या चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सर्जू गोविंद लोंढे (वय 30, रा. गँगवाडी), निखाब दस्तगीरसाब पिरजादे (38, रा. अशोकनगर), तबरेज इस्माईल नरगुंद (20, रा. टोपी गल्ली), शादाफ महंमदअली पिरजादे (28, रा. कलाईगार गल्ली, फोर्टरोड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींकडून 15 हजार किमतीचा  1500 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.  तसेच 1, 700 रु. रोख रक्कम अशाप्रकारे रक्कम 16 हजार 700 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सीसीबी सीपीआय बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. जयश्री माने, निंगाप्पा मादार, डी. एच. माळगी, बी. एस. नाईक, एस. एल. देशनूर, बी. बी. कड्डी, बसवराज बस्तवाड, शंकर पाटील, विजय बडवण्णवर, के.व्ही. चर्लिंगमठ, अडवेप्पा रामगोंनहट्टी, बी. बी. सुनगार, ए. बी. नवीनकुमार, शिवलिंग पाटील आदी पोलिस कर्मचार्‍यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग घेतला होता.