Thu, Nov 15, 2018 03:10होमपेज › Belgaon › स्कूल व्हॅन दुचाकीला धडकून चारजण ठार

स्कूल व्हॅन दुचाकीला धडकून चारजण ठार

Published On: Jan 19 2018 1:49AM | Last Updated: Jan 19 2018 12:38AMसंबरगी : प्रतिनिधी 

अथणी-विजापूर राज्यमार्गावर ऐगळी क्रॉसवर स्कूल व्हॅनने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 4 जण ठार झाले, तर 25 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. मृतांमध्ये दुचाकीवरील तिघे आणि व्हॅनचालकाचा समावेश आहे. 

आप्पासाहेब संबू मराठी (वय 40), मनोज दोडमनी (32), धानाप्पा मगदूम (38, सर्व रा. यलहडगी) आणि व्हॅनचालक सिद्धगिरी सिद्धाप्पा पुजारी (30, रा.आर्टाळ, ता.अथणी) अशी मृतांची नावे आहेत. तिघे मृत (आरकेरी, जि.विजापूर) येथून देवदर्शन घेऊन यलहडगीला परतत होते. त्यांना धडक देऊन क्रूझर व्हॅन त्यांच्यावरच पलटी झाले. त्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. जखमी विद्यार्थी माणीकप्रभु कन्नड प्राथमिक शाळेत शिकतात. त्यांच्यावर अथणीच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देसाईवाडी येथून माणिकप्रभू शाळेला रोज 25 मुले क्रूझरमधून जातात. गुरुवारी सकाळी 11च्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रूझर दुचाकीला धडकून पलटी झाली. क्रूझरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी होते. 

सागर ठक्‍कानावर, आकाश ठक्‍कानावर, विकास माने, नेहाल माने, प्रभू  हालेळी, संपत जगताप (65) हे गंभीर जखमी आहेत. त्यांना मिरज येथील शासकीय व खासगी दवाखान्यात पाठविण्यात आलेे. 25 विद्यार्थी किरकोळ जखमी असून, त्यांच्यावर अथणी शासकीय दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. काही विद्यार्थी सायंकाळपर्यंत बेशुद्ध होते.तालुका आरोग्याधिकाऱयांचे पथक उपचार करत आहे. घटनास्थळी ऐगळी पोलिस, अथणी पोलिसांनी दाखल होऊन  जखमींना हलवले. अथणी तालुक्यात 2005 मध्ये केएसआरटीसी बस पार्थनहळ्ळी येथे विहिरीत कोसळून 35 जणांना जलसमाधी मिळाली होती.