Thu, Apr 25, 2019 08:04



होमपेज › Belgaon › गणवेश मोफत, शिलाई महाग

गणवेश मोफत, शिलाई महाग

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 22 2018 8:37PM



बेळगाव : प्रतिनिधी

सरकारी शाळांमधून गणवेश शिवून घेण्यासाठी कापड देण्यात आले. मात्र, शिवून घेण्यासाठी 100 ते 350 रु. खर्च एका विद्यार्थ्याला येत आहे. काही संस्था कमी खर्चात गणवेश शिवून देण्याचे कंत्राट मिळवितात. मात्र ते गणवेश 15 ऑगस्ट आला तरी मिळत नाहीत, अशी अवस्था सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची झाली आहे.

शाळा सुरु होऊन महिना उलटल्यानंतर सरकारी शाळेतील मुलांना गणवेश मिळाला. मात्र तो आता शिलाई करुन घेण्यासाठी 100 ते 350 रु. खर्च येत आहे.

सरकारी शाळेत गरीब विद्यार्थी शिकत असतात, याची दखल घेऊन शहरातील काही खासगी संस्था व टेलरनी केवळ 100 रु.ला एक गणवेश शिऊन दाखविण्याची तयारी दाखविली आहे. मात्र ते गणवेश 15 ऑगस्ट आला तरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाहीत. अशी वस्तुस्थिती आहे. एका गणवेशाचे कापड विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. अजून एकाचे कापड द्यायचे आहे. शासनातर्फे शिवून मोफत द्यायचा असतो. तो विद्यार्थ्याना देताना एकाच प्रकारचे गणवेश असल्याने मापाप्रमाणे मिळत नाहीत, अशी पालकवर्गाची तक्रार आहे. 

शिलाईचा दर इतका आहे की त्या दरात तयार कपडे विकत घेता येतात. सरासरी 350 रु. शिलाई असून पांढर्‍या रंगाचा गणवेश शिवून घेण्याऐवजी तयार कपडे विकत घेणे पालक पसंत करतात. कारण तयार कपडे 350 ते 400 रु.ला विकतच मिळत आहेत. यामुळे तयार कपडे खरेदी करण्यावर भर देण्यात येत आहे.