Wed, Mar 20, 2019 03:01होमपेज › Belgaon › सौंदत्ती रेणुकादेवी यात्रा उद्या

सौंदत्ती रेणुकादेवी यात्रा उद्या

Published On: Jan 01 2018 1:54AM | Last Updated: Dec 31 2017 10:45PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

श्रीक्षेत्र सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवीची शाकंबरी पौर्णिमा यात्रा मंगळवारी होत आहे. यात्रेनिमित्त तब्बल पाच लाख भाविक सौंदत्ती डोंगरावर दाखल झाले आहेत. बेळगाव परिसरातील रेणुकाभक्तांचे जथ्थे आई उदो...च्या गजरात सौंदतीकडे अद्यापही रवाना होत आहेत. यात्रेनिमित्त देवस्थान आणि जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.

शाकंबरी पौर्णिमा यात्रेसाठी गेल्या आठवड्यापासून सौंदत्ती डोंगरावर भाविकांचे जथ्थे येत आहेत.   रेणुका भक्‍त जग आणि मानाची सासनकाठी घेऊन सौंदत्ती डोंगरावर आले आहेत. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जोगनभावी कुंडावर स्नानासाठी गर्दी होत आहे. कुंडावर जोगेश्‍वरी सत्यव्वा देवीचे दर्शन घेऊन लिंब नेसण्याचा कार्यक्रम उरकून भाविक डोंगरावर दाखल होत आहेत. डोंगरावरील यात्री निवास भाविकांनी भरले आहेत. खुल्या जागेवर मोठ्या संख्येने राहुट्या उभारण्यात आल्या आहेत. 

यात्रेनिमित्त  कर्नाटक परिवहन मंडळातर्फे जादा बसेसची सोय करण्यात आली आहे.डोंगरावर खासगी वाहनांची गर्दी वाढली आहे. यात्रे दरम्यान डोंगरावर होणार्‍या रहदारीचा अंदाज घेत पोलिस प्रशासनाने वाहतुकीसंदर्भात उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मंदिराकडे जाणार्‍या मार्गावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मुख्य मार्गावर वाहनांना प्रवेश निर्बंध लादण्यात आले आहेत. यात्रेदरम्यान सौंदत्ती डोंगरावर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.