Sat, May 30, 2020 05:22होमपेज › Belgaon › संगोळी रायण्णा सोसायटी चौकशी सीसीआयडीकडे

संगोळी रायण्णा सोसायटी चौकशी सीसीआयडीकडे

Published On: Jul 24 2018 1:07AM | Last Updated: Jul 23 2018 11:41PMबेळगाव : प्रतिनिधी

संगोळी रायण्णा सोसायटीच्या गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपविण्यात आली आहे. सोसायटीच्या हजारो ग्राहकांच्या ठेवी परत न केल्याप्रकरणी सोसायटीच्या संचालकांवर खडेबाजार पोलिस स्थानकासह विविध पोलिस स्थानकात तक्रारी नोंद आहेत. पुढील चौकशी आता सीआयडी करणार आहे. तथापि, शहर पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांच्याकडून त्याला दुजोरा मिळालेला नाही.

सोसायटीत सुमारे  210 कोटी रुपये अपहार केल्याचा आरोप कण्यात येत आहे. कांही दिवसांपूर्वी चेअरमन आनंद अप्पूगोळच्या हनुमान नगर येथील घरावर मोर्चा काढून आंदोलन केले होते. काही ठेवीदारांनी न्यायालयात धाव घेतली आहे, तर काही जणांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे. ग्राहक न्यायालयाच्या आदेशावरुन अप्पूगोळकडील सुमारे 30 दुचाकी व चारकाची कार जप्‍त करण्यात आल्या आहेत.

भीमांबिका सोसायटीच्या संचालिका असल्यामुळे आनंद  अप्पूगोळच्या पत्नीलाही अटक करण्यात आली होती. यावरुन सहकार क्षेत्रात गदारोळ माजला होता. पोलिस आयुक्‍त राजप्पा यांनी सदर प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपवणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सदर प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले आहे.