Mon, Aug 19, 2019 07:35होमपेज › Belgaon › आमदार पाटील ठरणार मध्यवर्तीचे उमेदवार?

आमदार पाटील ठरणार मध्यवर्तीचे उमेदवार?

Published On: Apr 30 2018 1:42AM | Last Updated: Apr 29 2018 11:48PMबेळगाव : प्रतिनिधी

मध्यवर्ती म. ए. समितीने विधानसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार जाहीर केले आहेत. बेळगाव उत्तर मतदारसंघातून उमेदवार जाहीर केलेला नाही. यामुळे याठिकाणी आ. संभाजी पाटील यांना मध्यवर्ती म. ए. समिती अधिकृत उमेदवार जाहीर करणार का? असा प्रश्‍न मराठी भाषिक मतदारातून उपस्थित केला जात आहे.

मध्यवर्ती म. ए. समितीकडे उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अ‍ॅड. अमर येळ्ळूरकर यांनी अर्ज केला होता. परंतु, त्यांचे नाव शहर म. ए. समितीने जाहीर केले नाही. यामुळे या मतदारसंघात मध्यवर्ती म. ए. समितीचे प्रतिनिधीत्व करणारा अधिकृत उमेदवाराची वानवा आहे. 

सध्या याठिकाणी आ. संभाजी पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्याची गरज आहे. 

आ. संभाजी पाटील हे मनपाच्या राजकारणात 25 वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहेत. त्यांचे मराठी भाषिकासह उर्दू, कानडी भाषिकांशी चांगले संबंध आहेत. त्यामाध्यमातून ते विजय खेचून आणू शकतात. यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीने त्यांना बळ पुरविणे अत्यावश्यक आहे.