Sun, Jul 21, 2019 15:12
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › संभाजी भिडे यांच्या सभेला हजारोंच्या संख्येने हजर रहा

संभाजी भिडे यांच्या सभेला हजारोंच्या संख्येने हजर रहा

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 07 2018 11:43PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे येत्या दि. 14 जानेवारी रोजी संभाजी भिडे गुरुजी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेला शिवप्रेमीनी मोठ्या संख्येने हजर रहाव, असे आवाहन शिवप्रतिष्ठाणच्या बैठकीत अध्यक्ष किरण गावडे यांनी केले. ताशीलदार गल्‍ली येथील सोमनाथ मंदिर येथे शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान तर्फे मार्गदर्शन बैठकीचे  आयोजन करण्यात आले होते. 

येत्या 14 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वा संभाजी मैदान महाव्दार रोड येथे भिडे गुरुजींच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.  या सभेला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येंने उपस्थित राहून गुरुजींच्या  मौलिक विचारांचा लाभ घ्यावा. यासाठी तालुक्यासह परिसरात मोठ्या प्रमाणात जागृती करुन अधिकाधिक संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी  केले. 

करवे नेता नारायण गौडा यांनी छ.शिवाजी महाराजांच्या घोषणेवरुन केलेल्या वक्‍तव्याचा निषेध करण्यात आला. तसेच रायगडावर महाराजांचे 32 मण सुवर्ण सिंहासन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी  जागृती करण्याचा निश्‍चय बैठकीत करण्यात आला. तसेच प्रतिष्ठाणतर्फे दि. 26 ते 30 जानेवारी दरम्यान प्रतापगड ते रायरेश्‍वर मोहीम आयोजीत करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. 

शहर  प्रमुख अजित जाधव, तालुका प्रमुख कल्‍लाप्पा पाटील, शहर कार्यवाह विश्‍वनाथ पाटील, किरण बडवाणाचे, चंद्रशेखर चौगुले, अंकुश केसरकर, गजानन पवार, अमोल राजगोळकर, परशराम पाटील, संदीप पाटील, जोतिबा मासेकर, मधु कंग्राळकर, परशराम मन्‍नोळकर, महेश  पाटील, नाथा अंबोळकर, मिथिला जाधव आदी कार्यकर्ते  उपस्थित होते.