होमपेज › Belgaon › संभाजी भिडेंना पुन्हा बेळगावात प्रवेश बंदी

संभाजी भिडेंना पुन्हा बेळगावात प्रवेश बंदी

Published On: Jul 20 2018 1:10AM | Last Updated: Jul 20 2018 1:10AMबेळगाव : प्रतिनिधी

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडेंवर 21 ते 31 जुलै या काळात कर्नाटकात बंदीचा आदेश जिल्हाधिकारी एस. झियाऊल्ला यांनी बजावला आहे. त्यामुळे संकेश्वर येथे 21 जुलै रोजी होणार्‍या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार नाहीत.

महाराष्ट्रातील कोरेगाव-भीमा येथील दंगली भिडे यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे झाल्या होत्या असा आरोप आहे. त्यामुळे हा आदेश लागू करण्यात आला आहे.

यापूर्वी बेळगाव येथे होणार्‍या शिवप्रतिष्ठानच्या कार्यक्रमाआधी त्यांना बंदी घातली होती. भिडे यांची भाषणे दोन समाजात तेढ निर्माण करणारी असतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. कोणाच्याही भावना दुखावू नये म्हणून बंदी घालण्यात आल्याचे आदेशात  म्हटले आहे. 

21 जुलै रोजी रात्री 12 ते 31 जुलै रोजी दुपारी 12 पर्यंत प्रवेशबंदी आहे. दुर्ग रायगड येथे स्थापन होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे 32 मण सुवर्ण सिंहासन आणि खडा पहारा या संदर्भात  संकेश्वर येथे 21 रोजी सभेचे आयोजन करण्यात आले होते.