Tue, Mar 26, 2019 02:21होमपेज › Belgaon › दोन शेतकर्‍यांच्या कर्जांमुळे आत्महत्या

दोन शेतकर्‍यांच्या कर्जांमुळे आत्महत्या

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 17 2018 11:13PMसंबरगी : प्रतिनिधी

कर्जांची परतफेड करता न आल्याने दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.हल्याळ (ता. अथणी) येथील संजय बसय्या मठद (वय 45) आणि हुलगबाळी येथील हणमंत नाईक (वय 32) अशी त्यांची नावे आहेत. 

संजय मठदवर पीकेपीएस संघाचे 70 हजार रुपये, मलप्रभा ग्रामीण बँकेचे दीड लाखाचे आणि हातउसणे घेतलेले दोन लाख असे एकूण 4 लाख 20 हजार रुपयांचे कर्ज होते. त्याची दोन एकर जमीन आहे. पण, नापीक झाली आहे. त्यातच कर्जाचा तगादा लागल्यामुळे त्याने  गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. त्याच्या पश्‍चात पत्नी, आई, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

आत्महत्येची दुसरी घटना हुलगबाळी (ता. अथणी) येथे घडली आहे. हणमंत भुताली नाईक (वय 32) यानेही मळ्यातील झाडास गळफास लावून आत्महत्या केली. हणमंतची एका एकर जमीन असून त्याच्यावर अथणी शहरातील बँका आणि सोसायटीचे मिळून एकूण 5 लाख 70 हजार रुपयांचे कर्ज होते. कर्जाची वेळेत परतफेड करण्यासाठी होणार्‍या तगाद्यास कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे.अथणी पोलिसात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आल असून उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.