होमपेज › Belgaon › सांबर शिंगे विक्री; ५ जणांना अटक

सांबर शिंगे विक्री; ५ जणांना अटक

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 20 2018 11:49PMबेळगाव : प्रतिनिधी

सांबरांची कत्तल करून त्यांच्या शिंगांची विक्री करणार्‍या पाच जणांच्या टोळीला बेळगुंदी येथील बाळू बिजगर्णीकर यांच्या शेतवडीमध्ये सीसीबी पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्‍त डी. सी. राजाप्पा यांनी पत्रकार परिषदेत दिली.  11 किलो 250 ग्रॅम वजनाची ही शिंगे आहेत. 

नागेश मादार (वय 23), रामचंद्र सदाशिव दळवी (27, दोघेही रा. मणतुर्गा, ता. खानापूर), रवींद्र कोलकार  (27), परशराम भीमाप्पा निलजकर (23), अमन कणबर्गी (20, तिघेही रा. हडलगा, ता. खानापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

शिंगे पॉलिश करून ते हत्तीचे सुळे असल्याचे भासवून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परशराम निलजकर आणि अमन कणबर्गी यांनी शिंगे खरेदी केली होती. त्यांनाही अटक करण्यात आली. सीसीबीचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत एलटी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्‍यांनी केली.