Thu, Jul 18, 2019 02:36होमपेज › Belgaon › दहावीच्या १६००० विद्याथ्यार्ंचे भवितव्य अधांतरी

दहावीच्या १६००० विद्याथ्यार्ंचे भवितव्य अधांतरी

Published On: Dec 16 2017 1:40AM | Last Updated: Dec 15 2017 11:07PM

बुकमार्क करा

बंगळूर : प्रतिनिधी

राज्यातील 326 माध्यमिक शाळांनी आपल्या सलग्नतेचे नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे राज्यातील एकूण 16000 विद्यार्थ्यांना  कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळ त्या विद्यार्थ्यांना मार्च किंवा एप्रिलमध्ये एसएसएलसी परीक्षेला बसायला परवानगीच देवू  शकत नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यार्ंचे भवितव्य अधांतरी ठरले आहे.

शिक्षण खात्याच्या अधिकार्‍यांनी त्या शाळांना अनेकवेळा स्मरणपत्रे पाठवून शाळा सलग्नतेचे नूतनीकरण करून घ्यावे यासाठी सांगण्यात आले होते. परंतु त्या शाळांनी सलग्नतेसाठी शिक्षण खात्याकडे शेवटपर्यंत अर्जच केलेले नाहीत. त्या शाळांच्या विद्यार्थ्यांचे आता एक वर्ष वाया जाण्याचा  धोका निर्माण झाला आहे. कर्नाटक शिक्षण कायद्या नियमाप्रमाणे प्रत्येक शाळेने कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाची सलग्नता मिळविलीच पाहिजे. ती सलग्नता नसेल तर त्या शाळा अनधिकृत समजल्या जातात. त्यासाठी त्या शाळांनी परीक्षा मंडळाची सलग्नता मिळविण्यासाठी तातडीने आता तरी अर्ज केले पाहिजेत. शेवटच्या क्षणी त्यांनी यासाठी अर्ज केले तर आम्ही काहीच मदत करून शकत नाही, असे मंडळाच्या अधिकार्‍यांचे स्पष्ट म्हणणे आहे. प्रत्येक शाळेने दर पाच वर्षातून एकदा सलग्नतेचे नूतनीकरण करून घेतले पाहिजे.

तालुका पातळीवरील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या 25 पेक्षा कमी आहे. त्या शाळांना सलग्नता देण्यास  नकार दर्शविण्यात आला आहे. यासंदर्भात प्राथमिक व माध्यमिक  शाळा व्यवस्थापन संघटनेचे सरचिटणीस डी. शशीकुमार  म्हणाले, विद्यार्थ्याची संख्या कमी आहे. म्हणून सलग्नता नाकारणे हे बेकायदेशीर आहे. किमान 25 विद्यार्थी संख्या आवश्यक आहे. आतापयर्ंत त्याप्रमाणेच सलग्नता देण्यात आलेली आहे. परंतु शिक्षण खात्याने यावर्षी सुधारित आदेश काढून विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल तर त्या शाळांना सलग्नता मिळू शकत नाही. काही अधिकारी शाळांची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. ज्या शाळांनी अर्ज केले नसतील त्या शाळांकडून ऑनलाईनवर अर्ज स्वीकारून त्यांची सलग्नता मंजूर करावी. त्यामुळे शेवटच्या क्षणाला शाळांना व अधिकार्‍यांना संघर्ष करावा लागणार नाही.

परीक्षा मंडळाने यासंदर्भात नोडल अधिकार्‍यांना त्या शाळांना भेटी देवून त्यांच्या समस्या जाणून घेवून तालुका पातळीवरील शाळांना सलग्नता मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे कळविले आहे. सलग्नता नूतनीकरण करण्यासाठी अनामत 20,000 रु.सह एकूण 50,000 रु. त्या शाळांनी परीक्षा मंडळाकडे भरायला पाहिजेत. यावर्षी एसएसएलसीला एकूण 8 लाख विद्यार्थी बसणार आहेत. मागीलवर्षी बंगळूरमधील 35 विद्यार्थ्यांना सलग्नतेअभावी परीक्षेला बसता आले नव्हते.