Sun, May 26, 2019 16:47होमपेज › Belgaon › ‘ऑडिओ टेप’ची एसआयटी चौकशी : कुमारस्वामी

‘ऑडिओ टेप’ची एसआयटी चौकशी : कुमारस्वामी

Published On: Feb 12 2019 1:05AM | Last Updated: Feb 11 2019 11:53PM
बंगळूर : वृत्तसंस्था

वस्तुस्थिती काय आहे, हे समजण्यासाठी या ‘ऑडिओ टेप’ची एसआयटीमार्फत सखोल चौकशी होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सोमवारी केली. काही दिवसांपासून कर्नाटकातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. ‘ऑपरेशन कमळ’ म्हणून भाजपने कर्नाटकात जय्यत तयारी केली होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती. यादरम्यान, आघाडीतील काही आमदारांना कोट्यवधी रुपये देण्याचे आमिष दाखवण्याचे प्रयत्न होत असल्याची एक ‘ऑडिओ टेप’ गेल्या आठवड्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सभापती रमेशकुमार यांच्यासमोर सादर केली होती. दरम्यान, भाजपने आमच्या आमदारांना कुमारस्वामी यांनी प्रत्येकी 25 कोटी रुपये देण्याचे आमिष दाखविल्याची व्हिडीओ क्‍लिप (चित्रफित) असल्याचे जाहीर करून धमाल उडवून दिली. त्यामुळे या आरोप-प्रत्यारोपांचे पडसाद थेट दिल्लीत उमटले आहेत.