Thu, Sep 20, 2018 04:18होमपेज › Belgaon › एसबीआय फसवणूक : चौघांना कोठडी

एसबीआय फसवणूक : चौघांना कोठडी

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 26 2018 11:50PMबेळगाव : प्रतिनिधी 

उत्तरप्रदेश सरकारच्या रोजगार हमी योजनेच्या खात्याचे बनावट धनादेश  देऊन 2 कोटी 72 लाख रुपये दुसर्‍या खात्यावर वर्ग करण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघांना न्यायालयाने सोमवारी पोलिस कोठडी सुनावली. 

उत्तर प्रदेश सरकारचा बनावट धनादेश देऊन फसवणुकीच्या प्रयत्नासंदर्भात पराग निमसे यानी पोलिस तक्रार दिली होती.  त्यानंतर   आरीफ शिवापूर (रा. शाहूनगर), शशिधर नागनूर (रा. रुक्मिणीनगर), नारायण शेट्टी (रा. म्हैसूर), महम्मद गौस फजल रेहमान (रा. म्हैसूर)यांना  एपीएमसी पोलिसांनी बुधवारी अटक केली होती.  

प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. पोलिसांच्या मागणीनुसार त्या संशयितांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. प्रकरणातील अन्य दोन संशयित  महम्मंद  अब्दुल सत्तार  आणि इम्रान (दोघेही रा. म्हैसूर) फरार आहेत. त्यांचाही पोलिस शोध घेत आहेत.