Thu, Jun 20, 2019 01:27होमपेज › Belgaon › शाळा दुरुस्तीसाठी ९१ कोटी रुपयांची मागणी 

शाळा दुरुस्तीसाठी ९१ कोटी रुपयांची मागणी 

Published On: Jul 20 2018 1:10AM | Last Updated: Jul 19 2018 8:48PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सात तालुक्यांतून 631 सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या खोल्यांच्या दुरूस्तीसाठी सार्वजनिक शिक्षण विभागातर्फे जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांनी सरकारकडे दुरुस्ती निधीची मागणी केली आहडे. प्राथमिक शाळांंच्या दुरूस्तीसाठी 80.52 कोटी आणि माध्यमिक शाळांतील खोल्यांसाठी 10.70 कोटी अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यता आली आहे. 

दोन वर्षापूर्वी यमकनमर्डी संघातील सरकारी प्राथमिक शाळेची भिंत पडून एका विद्यार्थ्यांला  जीव गमवावा लागला होता. त्यानंतर अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला. अशा धोकादायक खोल्यांत विद्यार्थ्यांना बसवू नये, अशा सूचना  मुख्याध्यापकांना बैठकीत करण्यात आल्या. 

यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी 631 शाळांची यादी तयार केली आहे. जिल्ह्यातील एकूण 552 प्राथमिक शाळांतून आणि 840 माध्यमिक शाळांतील वर्ग खोल्यांची दुरूस्ती करण्यात येत आहे. त्यापैकी 631 शाळा अतिधोकादायक असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी 90 कोटींचा निधी मागण्यात आला आहे. 

पाण्याची समस्या    

सुमारे 30 प्राथमिक शाळांतून आणि  5 माध्यमिक शाळांतून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यासाठी प्राथमिक शाळांसाठी 35 लाख आणि माध्यमिक शाळांसाठी 10 लाख अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. 

खेळाचे मैदान

जिल्ह्यातील अनेक शाळांना जागा उपलब्ध आहे. मात्र मैदानांची व्यवस्था करण्यात आली नाही. खेळाचे साहित्य नाही. काही शाळांना मैदान नाहीत. त्यामुऴे समैदानच्या विकासाठी  5.42 कोटी अनुदनांची मागणी केली आहे. 

शहापूर येथील सरकारी माध्यमिक आणि पदवीपूर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वर्गातही छत्री घेऊन बसावे लागत आहे. छताला गऴती लागली आहे. हीच परिस्थिती अन्य शाळांतूही दिसून येत आहे. सरकारने तातडीने अनुदान मंजूर करून येथील दुरूस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी विद्यार्थीनी व पालकांतून होत आहे.