Tue, Apr 23, 2019 21:49होमपेज › Belgaon › कायद्याचे उल्लंघन केल्यास रौडी यादीत समावेश 

कायद्याचे उल्लंघन केल्यास रौडी यादीत समावेश 

Published On: Apr 23 2018 1:14AM | Last Updated: Apr 23 2018 12:18AMबेळगाव : प्रतिनिधी

निवडणुका शांतेत व सुरळीतपणे पारपडण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांदरम्यान कोणत्याच प्रकारची हुल्‍लडबाजी अथवा निवडणुक काळा अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍यांची गय केली जाणार नाही. कोणी असा प्रयत्न केल्यास त्यांचा रौडी यादीत समावेश करण्यात येईल असा इशारा आयजीपी अलोककुमार यांनी दिला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुक काळात सुरक्षा व्यवस्था पुरविण्यावर भर देण्यात आला . बेळगाव, बागलकोट, विजापुर, धारवाड, गदग, या जिल्ह्यांचा प्रवास करुन सुरक्षा यंत्रनेबाबतचा अहवाल संबंधित जिल्ह्याच्या पोलिस प्रमुखांकडुन घेण्यात आला आहे . या जिल्ह्यात मध्ये प्रवास करुन संवेदनशिल भागातील सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. विशेष करून संबंधीत पोलिस स्थानकाच्या हद्दीतील गुन्हेगारांची परेड घेवून कडक सूचना करण्यात आल्या आहेत. याबरोबरच परवानाधारक शस्त्रास्त्र मिळविलेल्यांकडून शस्त्रे ताब्यात घेण्यात आली आहेत, अशी तयारी आयजीपी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. 

आंतरराज्य गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी तसेच आंतरराज्य सीमा सुरक्षतेसाठी 35 ठिकाणी चेकपोष्ट उभारण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे अधिक कुमक तैनात करण्यात आली आहे. राज्याच्या सीमा भागावर अधिक कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष करून गोवा व महाराष्ट्र या भागातून ये-जा करणार्‍या वाहनांवर नजर ठेवण्यात आली आहे. त्यासाठी महाराष्ट्र व गोवा पोलिसांचे सहकार्य मिळाले आहे. उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सीमाभागात सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येत आहे. आवश्यक पडल्यास अधिक पोलिसांची नेमणूक करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. पोलिस प्रमुख आणि संबंधीत पोलिस ठाणा अधिकारी संवेदनशील भागावर नजर ठेवून आहेत.

चेकपोष्ट चेकींग, फ्लाईंगस् स्कॉड, रवडी प्रीवेन्शन एनव्हीडब्लू, पोलिस पथसंचलन आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. आयजीपींच्या व्याप्तीत येणार्‍या पाच जिल्ह्यांमध्ये सर्वसुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे. यामध्ये बबलेश्वर, रायबाग, कागवाड, हुक्केरी, गोकाक आणि इतर काही मतदार संघ अति संवेदनशील म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यासाठीच आयजीपीनी कायदा सुव्यवस्थेवर भर दिला आहे. याचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

Tags : Belgaum, Rowdy, list, includes, violation,  law