Wed, Jul 17, 2019 15:59होमपेज › Belgaon › आमदारांना मनपात कक्ष

आमदारांना मनपात कक्ष

Published On: Aug 05 2018 1:28AM | Last Updated: Aug 04 2018 11:08PMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीपूर्वी महानगरपालिकेतील आमदारांचे कक्ष व फलक हटविण्यात आले होते. निवडणूक होऊन अडिच महिन्यांचा कालावधी लोटला तरी आमदारांना कक्ष व फलक देण्यात आले नव्हते. यासंबंधी ‘मनपातील तिन्ही आमदार कक्ष बंद’ या मथळ्याखाली ‘दै. पुढारी’ने 22 जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत अखेर तिन्ही आमदारांना महानगरपालिकेत  कक्ष व फलक मिळाला आहे. 

विधानसभा निवडणुकीत उत्तर मतदारसंघातून अ‍ॅड. अनिल बेनके, दक्षिणमधून अभय पाटील व यमकनमर्डीतून सतीश जारकीहोळी निवडून आले आहेत. यानुसार त्यांना महापालिकेत तातडीने कक्ष देणे गरजेचे होते. मात्र, मनपाच्या दुर्लक्षामुळे अडिच महिना त्यांना कक्षाची प्रतीक्षाच करावी लागली, अखेर कक्ष मिळाला. यापूर्वी उत्तरमधून फिरोज सेठ, दक्षिणमधून संभाजी पाटील व सतीश जारकीहोळी आमदार होते. यापैकी दोन मतदारसंघांत बदल झाले आहेत.  निवडणुकीपूर्वी आमदारांच्या कक्षासमोरील नामफलक काढण्यात आला होता. निवडणूक निकाल लागूनही संबंधित आमदारांचे नामफलक बसविण्यात आले नव्हते.