Thu, Nov 15, 2018 07:22होमपेज › Belgaon › पालिका निवडणुकीत महिलांची भूमिका महत्त्वाची! 

पालिका निवडणुकीत महिलांची भूमिका महत्त्वाची! 

Published On: Aug 15 2018 2:04AM | Last Updated: Aug 15 2018 2:04AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यातील 29 ऑगस्टरोजी होणार्‍या चौदा पैकी 11 स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये महिला मतदारांचा टक्‍का पुरुषापेक्षा जास्त आहे. एकूण बेळगाव जिल्ह्यात मात्र पुरुषांचा टक्‍का अधिकच राहिला आहे. पुरुषापेक्षा महिला महिला मतदारांची संख्या वाढल्याचे पहिल्यांदाच चित्र जिल्ह्यात दिसत आहे. 29 ऑगस्टरोजी बेळगाव जिल्ह्यातील चौदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. यापैकी 11 स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. 

महिला मतदारसंख्या अधिक असणार्‍यामध्ये खानापूर, निपाणी, सदलगा, बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग, गोकाक, कुन्नूर, मुुडलगी, संकेश्‍वर, हुक्केरी, आदींचा समावेश आहे. चिकोडी, कुडची आणि रायबाग आदी ठिकाणी पुरुष मतदारांची संख्या अधिक आहे. बैलहोंगल नगरपरिषदेमध्ये महिला मतदारांची संख्या 796 ने अधिक आहे.  स्थानिक स्वराज्य संस्था आणि पुरुषांपेक्षा अधिक महिला मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. सौंदत्ती, 244, रामदुर्ग 188, गोकाक 1375, कोन्नूर 280, मुडलगी 260, संकेश्‍वर 571, हुक्केरी 363, खानापूर 142, निपाणी 364, सदलगा 59. चिकोडी परिषद, कुडची आणि रायबाग नगर पंचायतीच्या निवडणुकीत पुरष मतदारांची संख्या महिला पेक्षा अधिक आहे.

जिल्ह्यात पुरुषांचीच मक्‍तेदारी 

चौदा पैकी 11 स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिला मतदारांची संख्या वाढली असली तरी एकूण जिल्ह्यत मात्र पुरुष मतदारांची संख्याच महिला पेक्षा अधिक आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये बेळगाव जिल्ह्याची एकूण मतदारसंख्या 36 लाख 57 हजार 541 होती. पुरुष मतदार 18 लाख 54 हजार 485, तर महिला मतदार 18 लाख 2 हजार 709 होते. पुरुष मतदारांची संख्या 51 हजार 695 इतकी महिला पेक्षा अधिक होती. त्याचबरोबर एप्रिल 2018 च्या मतदार नोंदणीमध्ये बेळगाव जिल्ह्याची मतदार संख्या 37 लाख 23 हजार 585 झाली . यामध्ये पुरुष मतदार 18 लाख 88 हजार 415 तर महिला मतदारांची संख्या 18 लाख34 हजार 894 झाली. यावेळी पुरुष मतदारांची संख्या महिला पेक्षा 53 हजार 521 ने अधिक आहे.