Wed, Apr 24, 2019 12:13होमपेज › Belgaon › निवृत्त जवान-पोलिस वादावादी

निवृत्त जवान-पोलिस वादावादी

Published On: Apr 30 2018 1:42AM | Last Updated: Apr 29 2018 11:30PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव सांबरा रोडवर माजी जवानाची गाडी रोखल्याने रहदारी पोलिस व माजी जवानामध्ये शाब्दिक चकमक उडाली.  सुमारे तासभर या रस्त्यावर त्यांची वादावादी सुरू होती. अखेर जवानाने माफी मागितल्यानंतर या वादावर पडदा पडला. रविवार दि. 29 रोजी ही घटना घडली.

सांबर्‍याहून एक निवृत्त जवान आपली चारचाकी भरधाव घेऊन येत होता. त्यामुळे सांबरा रोड भवानी  गॅरेजजवळ बंदोबस्तासाठी असलेल्या रहदारी पोलिसांनी  निवृत्त जवानाला हटकले. त्यामुळे पोलिस आणि त्या  निवृत्त जवानामध्ये वादावादी झाली.  एक तास  निवृत्त जवान रहदारी पोलिसांसमवेत हुज्जत घालत होता. याची माहिती माळमारुती पोलिस स्थानकाला मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक किंगळेकर यांनी घटनास्थळी आले.‘निवडणूक पार्श्‍वभूमीवर शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तुम्ही नियमबाह्य गाडी चालवत असून सीटबेल्टही लावला नाही. त्याशिवाय वेगमर्यादा देखील 40 पेक्षा अधिक आहे. त्यामुळे सेवा बजावत असलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत आहात’, असे त्यांनी  निवृत्त जवानाला सांगितल्यानंतर जवानाला आपली चूक उमगली व त्याने पोलिसांची माफी मागतली. त्यानंतर वादावर पडदा पडला. 

सध्या निवडणुकीचा काळ असल्याने आजी-माजी मंत्री स्टार प्रचारकांची बेळगावात अचानक वर्णी लागत असल्याने स्थानिक पोलिसांसह रहदारी पोलिसांंवर वाहतूक नियंत्रित करताना ताण पडत आहे. त्यामुळे रहदारीसाठी रस्ते काही काळापुरते बंद करण्यात येत आहेत. मात्र काही वेळेला वाहनचालक आणि रहदारी पोलिसांमध्ये वादावादाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनीही नियमांचे पालन करण्याची गरज आहे.