Tue, Jun 18, 2019 22:32होमपेज › Belgaon › अबकारी खात्याकडून मद्यपुरवठ्यावर निर्बंध

अबकारी खात्याकडून मद्यपुरवठ्यावर निर्बंध

Published On: Apr 21 2018 12:59AM | Last Updated: Apr 20 2018 10:58PMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर अबकारी खात्याकडून मद्यपुरवठ्यावर निबर्ंध लादण्यात आले आहेत. यामुळे भविष्यात राज्यभरात मद्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे.  निवडणूक आयोगाने सूचना केल्याप्रमाणे राज्यात सर्व बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट व मद्याच्या दुकानामध्ये मद्यवितरण करण्यात प्रमाण ठेवले आहे. मद्यविक्रेत्यांकडून मागणी केल्याप्रमाणे मद्यपुरवठा केला जात नाही. यामुळे मद्यविक्रेत्यांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अबकारी खात्याकडून मार्च अखेरपर्यंत 18050 कोटी रुपये  मद्याची विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र अबकारी खात्याकडूनच मद्याचा कमीप्रमाणात पुरवठा केला जात असल्याने मागणीनुसार पुरवठा करणे अशक्य होत आहे, असे मद्यविक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. 

गेल्यावर्षी मद्याच्या विक्रीप्रमाणात मोठ्याप्रमाणात वाढ झाली होती. मात्र निवडणूक असल्याने मागणीनुसार पुरवठा होत नाही. मद्याच्या मागणीत वाढ होत असले तरी पुरवठ्यात कमतरता आहे. त्यामुळे विक्रीचे उद्दिष्ट गाठणे अशक्य असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मद्य विक्रेत्यांवर अनेक नियम व अटी लादल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने महामार्गापासून 500 मीटरवर मद्यविक्रीची लादलेली अट मद्यविक्रीसाठी मारक ठरत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. निवडणूक आयोगाकडून मद्यपुरवठ्यावर निर्बंध घातल्याने मागणीनुसार पुरवठा करणे अशक्य होत असल्याचे अबकारी खात्याच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. निवडणूक काळात मद्य पुरवठ्यावर निवडणूक आयोगाने विशेष नजर ठेवली आहे. याबरोबरच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी मद्यविक्रीसंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून निर्बंध लादण्यात आले आहेत.

Tags : Belgaum, Restriction, wine, excise, department