Thu, Jan 17, 2019 20:28होमपेज › Belgaon › प्लास्टिक ध्वजांवर निर्बंध घाला

प्लास्टिक ध्वजांवर निर्बंध घाला

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 25 2018 10:25PM
बेळगाव : प्रतिनिधी

प्रजासत्ताकदिन व स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी प्लास्टिक राष्ट्रध्वजांची विक्री केली जाते. नंतर ध्वज विविध ठिकाणी पडलेले दिसतात. अशाने राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याने न्यायालयाने प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विक्रीला निर्बंध घातले आहे. त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन करण्यात आली. 

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विक्री करण्यात येते. त्याची कालांतराने विटंबना होते. याबाबत हिंदू जनजागृती समितीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वज विक्रीवर निर्बंध आणले आहेत. तरीही अनेक ठिकाणी त्याची विक्री केली जात आहे. ती त्वरित थांबविण्यात यावी. राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाने प्रबोधन करण्यास कृती समिती स्थापन करावी, अशी सूचना केली आहे. त्यानुसार जळगाव येथे स्थापण्यात आलेल्या समितीत हिंदू जनजागृती समितीचा समावेश आहे. या कार्यक्षेत्रातही हिंदू जनजागृतीचा समावेश करण्यात यावा.  राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा, या विषयावर प्रश्‍नमंजुषा घेण्यास अनुमती द्यावी, प्रबोधनासाठी समितीकडून बनविलेली चित्रफित चित्रपटगृहात दाखविण्यास अनुमती द्यावी, आदी मागण्याही त्यांनी केल्या. यावेळी सुधीर हेर्लेकर व इतर उपस्थित होते.