Thu, May 23, 2019 14:23
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › येळ्ळूर सर्पप्रदर्शनाला प्रतिसाद

येळ्ळूर सर्पप्रदर्शनाला प्रतिसाद

Published On: Aug 17 2018 1:34AM | Last Updated: Aug 16 2018 10:21PMबेळगाव : प्रतिनिधी

पर्यावरणाचा समतोल राखण्यात सर्पांचा महत्त्वाचा वाटा असतो. सर्पापैकी निम्म्याहून अधिक सर्प बिनविषारी असतात. मात्र समाजात अज्ञानामुळे सर्पाविषयी भीती असून त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घ्यावा, असे उद्गार माजी आ. परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी केले. प्रदर्शनाचा लाभ सुमारे 5 हजार नागरिकांनी घेतला.

येळ्ळूर येथे निर्झरानंद सर्प-वृक्ष संवर्धन संस्थेच्यावतीने नागपंचमीचे औचित्य साधून बुधवारी सर्पप्रदर्शन वैज्ञानिक प्रदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून नंदिहळ्ळी बोलत होते. अध्यक्षस्थानी येळ्ळूरचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र पाटील होते.

शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन रामचंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आ. नंदिहळ्ळी म्हणाले, आनंद चिठ्ठी व निर्झरा चिठ्ठी या दांपत्याच्यावतीने सुरू असणारे कार्य कौतुकास्पद आहे. बेळगाव, चंदगड परिसरात त्यांच्या कार्यामुळे शेकडो सर्पांना जीवदान मिळाले आहे. त्याचबरोबर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सर्पाविषयी सुरू असणारी जागृती समाजात परिवर्तन घडत आहे.

यावेळी नाग, घोणस या विषारी सर्पांसह धामण, तस्कर, वेरुळा, कवड्या हे मानवी वस्तीत वाचविलेले सर्प प्रदर्शनात ठेवले होते. विषारी लक्षणे, सर्पदंश कसे टाळावेत, प्रथमोचार, सर्प मानवाचा मित्र कसा यावर फलकाद्वारे माहिती आनंद चिठ्ठी, निर्झरा चिठ्ठी यांनी  आली. गोपाळराव बिर्जे यांनी मनोगत व्यक्त केले.  नागरिक, विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

शिवराज युवक मंडळ. परिवर्तन गु्रप, मानव बंधुत्व वेदिके, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मराठी जागृती निर्माण संघ, जायंटस गु्रप, रोटरी क्लब व नवहिंद परिवार यांच्या सहभागाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.