होमपेज › Belgaon › ग्रामस्थांनीच केली पेयजल यंत्रणा दुरुस्त  

ग्रामस्थांनीच केली पेयजल यंत्रणा दुरुस्त  

Published On: Jun 17 2018 1:35AM | Last Updated: Jun 16 2018 10:43PMरायबाग : प्रतिनिधी 

अधिकार्‍यांच्या दुर्लक्षाला कंटाळून स्वःखर्चाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तालुक्यातील नसलापूर ग्रामस्थांनी केली. वारंवार सांगूनही अधिकार्‍यांनी दखल घेतली नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यातील नसलापूर. येथील अधिकार्‍यांना पिण्याच्या पाण्याबद्दल वेळोवेळी निवेदने दिली. अनेकदा कार्यालयात हजर राहून माहिती दिली. पण त्यांना अधिकार्‍यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. कृष्णा नदीतून पिण्याच्या पाण्यासाठी येथील सार्वजनिक नागरिक प्रयत्न करीत आहेत. येथील फिल्टर नादुरुस्त झाले आहे. याबद्दल अधिकार्‍यांनी माहिती दिली. 

नदीचे पाणी आता गढूळ झाल्याने हे पाणी पिण्यास योग्य नाही. यासाठी संबंधित अधिकार्‍यांना अनेकवेळा माहिती दिली. पण संबंधित कोणत्याही अधिकार्‍यांनी येथे भेट दिली नाही. त्यामुळे येथील काही ग्रामस्थांनी चर्चा करून 13 हजार रू. खर्चून फिल्टर दुरुस्त केला. नसलापूर गावात एक वर्षापूर्वी भूसेना निगमकडून हा पिण्याच्या पाण्याचा घटक बसविण्यात आला होता. पण फक्त तीनच महिने हा घटक सुरू होता.