होमपेज › Belgaon › ‘त्या’ रिसॉर्टचे दिवसाचे भाडे फक्‍त 8.50 लाख

‘त्या’ रिसॉर्टचे दिवसाचे भाडे फक्‍त 8.50 लाख

Published On: May 19 2018 7:46AM | Last Updated: May 19 2018 7:46AMबंगळूर : प्रतिनिधी

म्हैसूर रोडवरील या आलिशान रिसॉर्टचा एका दिवसाचा भाडे दर केवळ 8.50 लाख इतका आहे. हे आमदार बुधवारपासून तेथे वास्तव्यास आहेत. हे रिसॉर्ट गर्भश्रीमंत आमदार व माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांचे असून याचे नाव इगल्टन असे आहे. अद्ययावत सुविधांनी आणि आलिशान म्हणून त्याची ओळख आहे.

सत्तेसाठीचा जादूई आकडा गाठण्यासाठी भाजप हरतर्‍हेचे प्रयत्न करीत आहेत. घोडेबाजारालाही ऊत आला आहे. आपले आमदार भाजपच्या संपर्कापासून दूर रहावेत या हेतूने काँग्रेसने त्यांना तेथे ठेवले होते. या रिसॉर्टमधील एका रुमचे भाडे 5,500 ते 6500 रु. प्रतिदिन असा आहे. यातील बहुतेक खोल्या डबल आहेत. काही सिंगलही आहेत. काँग्रेसने आमदारांसाठी 120 खोल्या घेतल्या होत्या.

नेते किंवा आमदार आले म्हणून आमच्या मेनूत विशेष फरक नसतो. नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण यामध्ये विशेष बदल केला नाही. परंतु मोठ्या संख्येने एखादा गट आला तर एका मेगा जेवणासाठी 1500 ते 1800 रु. दरडोई दर आकारला जातो. असे येथील एका कर्मचार्‍याने सांगितले. रिसॉर्टमधील आमचा निवास म्हणजे ऐशोआराम किंवा खेळ नव्हता. एका तरुण आमदाराने सांगितले की, येथील रहाणे आम्हाला आव्हानात्मक आणि गांभीर्याचे होते. आम्ही येथे काही टी-20 साठी आलो नाही. तर आमच्यासाठी ही क्रिकेट टेस्ट आहे.

अनेक आमदार म्हणाले, अनेक नव आमदार घाबरलेले होते. बाहेर काय घडते हे त्यांना कळायला मार्ग नव्हता. काही आमदारांच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या जात होत्या. त्यामुळे ते भयभयीत होते. नव्याने निवडून आलेल्या आमदारांना पैशाची व इतर आमिषे दाखविली जात होती. यामुळे त्यांना तोडले जाण्याचा धोका होता. ज्येष्ठ आमदारांनी असे काही प्रयत्न घडू दिले नाही. रिसॉर्टमध्ये आमदारांसाठी बैठका व्हायच्या, धोरणात्मक चर्चा व्हायच्या. यातून मिळालेल्या फावल्या वेळेत आमदार तेथील तलावात जलतरणाचा आनंद घेत होते. हा आमच्यासाठी तणावाचा काळ होता. अशी प्रतिक्रिया बेंगळूरमधून सहावेळा निवडून आलेल्या एका आमदाराने व्यक्‍त केली.

इतका खर्च कोणाचा

इगल्टनमधील काही खोल्यांचा दर 6500, 5000, 5500, 6000 आणि 6500 रुपये असा होता. याचा सरासरी दर 7000 रु. होता. हा खर्च कोणी उचलला हे आमदारांना माहित नव्हते.

महागडा नाश्ता

डरदोई ब्रेकफास्टचा दर 450 रुपये अधिक कर इतका होता. हाच जेवायचा दर 800 अधिक कर इतका होता. रात्रीच्या जेवणाचा डरदोई दर 800 रु. आणि कर इतका होता.

ते नेमके काय खेळले

राजकारणाशिवाय त्यांनी बोर्ड गेम्स, व्हॉलिबॉल, क्रिकेट, फुटबॉल आणि बॅडमिंटन खेळाचा बहुतेक आमदारांनी आनंद घेतला.

Tags : karnataka, Election, MLA, Congress, Resort, Rent