Tue, Jan 22, 2019 10:37होमपेज › Belgaon › शहरातील हेल्मेट सक्‍ती शिथिल करा

शहरातील हेल्मेट सक्‍ती शिथिल करा

Published On: Jan 20 2018 1:38AM | Last Updated: Jan 20 2018 12:10AMबेळगाव : प्रतिनिधी

शहरातील हेल्मेट सक्‍तीला वकिलांनी विरोध केला आहे. शहरात विविध विकासकामे हाती घेण्यात आल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत असून वाहनांचा वेग कमी झाला आहे. याबरोबरच हेल्मेट घातल्याने डोक्याचे केस झडण्याचा धोका अधिक आहे. तसेच उष्मा आणि डोकेदुखीचा त्रास संभवतो. त्यामुळे शहरामध्ये हेल्मेट सक्‍ती करण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन वकिलांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले. 

शहरामध्ये स्मार्टसिटी अंर्तगत विविध विकासकामे हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांची गर्दी वाढल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण आले आहे. शहरामधील विकासकामांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत आहे. याबरोबरच ठिकठिकाणी गतिरोधक घालण्यात आल्याने वेगावर नियंत्रण बसले आहे. यामुळे शहरातील अपघाताचे प्रमाण कमी आहे. यासाठी शहरात हेल्मेट सक्‍ती करण्यात येऊ नये. हेल्मेटमुळे उष्म्याचा त्रास सोसावा लागणार आहे. तसेच हेल्मेट घातल्याने डोक्यावरील केस गळण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी हेल्मेट सक्‍ती करण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. 

शहरामध्ये दुचाकीवरून चेनस्नॅचिंंग करणार्‍या चोरट्यांची संख्या वाढली आहे. हेल्मेटसक्‍तीमुळे यामध्ये आणखी भर पडणार असून हेल्मेटसक्‍ती शिथिल करावी. हेल्मेट सक्‍ती केवळ राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर दुचाकी चालविणार्‍या वाहन चालकांवर करावी. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन शहरात  हेल्मेटसक्‍ती करू नये, अशी सूचना पोलिस प्रशासनाला करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. अ‍ॅड. अण्णासाहेब घोरपडे, अ‍ॅड.  प्रवीण रंगोले, अ‍ॅड. आर. बी. बोगार, अ‍ॅड. के. वाय. दिवटे, अ‍ॅड. एम. बी. बोंड्रे,  अ‍ॅड. सी. बी. काकडे आदी उपस्थित होते.