Mon, Aug 26, 2019 08:54होमपेज › Belgaon › लिंगायत धर्मासाठी केंद्राकडे शिफारस : मंत्री पाटील

लिंगायत धर्मासाठी केंद्राकडे शिफारस : मंत्री पाटील

Published On: Dec 05 2017 1:48AM | Last Updated: Dec 04 2017 11:39PM

बुकमार्क करा

विजापूर : प्रतिनिधी

राज्य सरकारने जानेवारीअखेरपर्यंत लिंगायत धर्माला स्वतंत्र दर्जा द्यावा, अशी शिफारस केंद्राकडे केली जाईल, असा विश्‍वास पाटबंधारेमंत्री एम. बी.  पाटील यांनी 
व्यक्त केला.

लिंगायत हा स्वतंत्र धर्म असून, 1881 पासून काही लोकांमुळे स्वतंत्र धर्मापासून तो वंचित राहिलेला आहे. आपण त्यासंदर्भात पुरातन वस्तू संशोधन खात्याकडून व इतर खात्यांकडून लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे म्हणून कागदपत्रे गोळा केली आहेत. हा धर्म 12 व्या शतकामध्ये उदयाला आला. त्यावेळी तो स्वतंत्र धर्म म्हणूनच 1871 पर्यंत ओळखला जात होता.