Mon, Sep 16, 2019 18:21होमपेज › Belgaon › मतिमंद युवतीवर बलात्काराचा प्रयत्न

मतिमंद युवतीवर बलात्काराचा प्रयत्न

Published On: Dec 08 2017 1:36AM | Last Updated: Dec 08 2017 12:07AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

हुतात्मा चौकाजवळ एका मतिमंद युवतीवर बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या दोघा युवकांना नागरिकांनी बेदम चोप दिला. यानंतर त्यांना खडेबाजार पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर घटना गुरुवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडली.

पीडित मतिमंद युवतीला जेवण देतो, असे सांगून दोघा नराधमांनी तिला रिक्षातून एका बोळात नेले. याठिकाणी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका महिलेला रिक्षात चाललेला अनुचित प्रकार निदर्शनास आला. तिने हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांना निदर्शनास आणून देताच संतप्त नागरिकांनी रिक्षातील युवकांना बाहेर काढून बेदम चोप दिला. 

दरम्यान, या घटनेची माहिती खडेबाजार पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर अधीक्षक सातेनहळ्ळी घटनास्थळी पोहोचले. दोन्ही नराधमांना पोलिस स्थानकात आणून त्यांची चौकशी सुरू केली.