Wed, Apr 24, 2019 01:30होमपेज › Belgaon › विधानसभेच्या अध्यक्षपदी सुरेशकुमार की रमेशकुमार?

विधानसभेच्या अध्यक्षपदी सुरेशकुमार की रमेशकुमार?

Published On: May 25 2018 1:08AM | Last Updated: May 24 2018 11:39PMबेळगाव : प्रतिनिधी

निजद-काँग्रेस युती सरकार सुरळीतपणे चालण्यासाठी विधानसभाध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यासाठी शुक्रवार (दि. 25) विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. गुरुवारी या पदासाठी काँग्रेसतर्फे रमेशकुमार आणि भाजपतर्फे सुरेशकुमार यांनी अर्ज दाखल केले. पक्षीय बलाबल पाहिल्यास युतीला अध्यक्षपद मिळणार हे निश्‍चित आहे. मात्र, पक्ष विरोधात मतदान झाल्यास भाजपला संधी मिळू शकते. भाजपकडे एकूण 104 जागा आहेत. तर काँग्रेस 78 आणि निजदकडे 37 व 2 अपक्ष अशा एकूण 117 जागा युतीकडे आहेत. आतापर्यंत 19 जणांनी विधानसभाध्यक्षपद भूषविले आहेत. विसाव्या अध्यक्षांची निवड उद्या होणार आहे.

दरम्यान, ऑपरेशन कमळची भीती लागून राहिल्याने काँग्रेस निजद आमदार आजही रिसॉर्टमध्ये वास्तव्यास होते. शुक्रवारी विश्‍वासदर्शक ठराव आणि विधानसभाध्यक्षपद निवडणूक होणार असल्याने निजद, काँग्रेससह भाजपने आपापल्या आमदारांना व्हीप जारी केले आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी चार दिवसांपूर्वी असणारी भीती आता कमी झाली असून युती सरकार पाच वर्षे टिकविण्याचा विश्‍वास कुमारस्वामी व्यक्‍त करत आहेत.