Tue, May 26, 2020 03:19होमपेज › Belgaon › चिकोडीत हिंदू संघटनांची रॅली

चिकोडीत हिंदू संघटनांची रॅली

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 28 2017 11:50PM

बुकमार्क करा
चिकोडी : प्रतिनिधी

करोशी येथील चेतन होन्नगोळ व रवींद्र हारोळी यांनी फेसबुकवर श्रीकृष्णासह हिंदू देवदेवतांबद्दल अश्‍लील भाषा पोस्ट व शेअर केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी चिकोडीत श्री रामसेनेसह हिंदू संघटनांनी रॅली काढली. प्रभारी तहसीलदार संजय कांबळे, पीएसआय संगमेश होसमनींना निवेदन देण्यात आले.

श्री रामसेनेचे तालुकाध्यक्ष विक्रम बनगे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी सरकारी विश्रामगृहापासून एन.एम.रोडवरून चिकोडी पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. बी. आर.संगाप्पगोळ, भाजप रयत मोर्चाचे राज्य संचालक महेश भाते, श्रीराम सेनेचे सचिव बसवराज कल्याणी, शेखर मुंडे  उपस्थित होते. निवेदनाव्दारे होन्नगोळ व हारोळी यांनी फेसबुकवर श्रीकृष्णांसह देवदेवतांबद्दल अश्‍लील भाषा पोस्ट व शेअर केले आहे. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. यामागे केवळ समाजात जातीय दंगली व अशांतता पसरविण्याचा हेतू आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी करण्यात आली .

संगाप्पगोळ म्हणाले, अशाप्रकारचे कृत्य अयोग्य असून पोलिसांनी योग्य कारवाई करावी. विक्रम बनगे यांनीही कारवाईची मागणी केली. बसवराज कल्याणी म्हणाले, वारंवार अशी कृत्ये वाढत असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी. पीएसआय संगमेश होसमनी यांनी शांततेचे आवाहन करत कारवाईचे आश्‍वासन दिले. जगदीश शिंगाई, एस. बी. कुंड्रुक, आर. आर. वटगुडे, पी. आर. मधाळे, एस. एम. शिंगाई, एस. एल. शिंगाई, रमेश चौगुले, अशोक शिंगाई व हिंदू बांधव उपस्थित होते.