Tue, May 21, 2019 13:09होमपेज › Belgaon › राजनाथ सिंग, रामदेवबाबा उद्या रायबागमध्ये

राजनाथ सिंग, रामदेवबाबा उद्या रायबागमध्ये

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 11 2018 11:49PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी 

रायबाग तालुक्यातील मुगळखोड येथील यल्ललिंगेश्‍वर महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त दि. 14 तारखेपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शनिवार दि. 13 रोजी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि योगगुरू व पतंजली पीठाचे प्रमुख रामदेवबाबा उपस्थित राहणार आहेत. 

मुगळखोड येथील यल्ललिंगेश्‍वर मठामध्ये या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्यभरातील विविध मठाधीश, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यासह विविध स्तरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.