Wed, Jul 24, 2019 08:42होमपेज › Belgaon › पावसामुळे 126 हेक्टर पीकक्षेत्र बाधित

पावसामुळे 126 हेक्टर पीकक्षेत्र बाधित

Published On: Jul 20 2018 1:10AM | Last Updated: Jul 20 2018 1:10AMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यामध्ये बरसणार्‍या पावसाने आणि नदीला आलेल्या पुरामुळे 126.98 हेक्टरवरील पिकांचे क्षेत्र बाधित झाले असून, 842 घरांची पडझड झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. त्याचबरोबर गेल्या अडिच महिन्यात सात जणांंचा मृत्यू झाला असूृन 23 जनावरेही दगावली आहेत. त्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.  जिल्ह्यातील नऊ पूल पाण्याखाली गेले असल्यामुळे या रास्त्यावरील वाहतूक दोन दिवसांपासून ठप्प आहे.

गेल्या महिनाभरापासून बेळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रातही जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे कृष्णासह वेदगंगा, दूधगंगा नद्यांना पूर आला आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील 126.98 हेक्टर इतके पिकाचे क्षेत्र बाधित झाले आहे. याठिकाणी आता दुबार पेरणीचे संकट उभारले आहे. या पिकांची नासाडी झाली आहे. बाधित क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे तात्काळ पंचनामे करुन प्रशासनाला अहवाल देण्याच्या सूचना तलाठी, तहसील कार्यालयाला देण्यात आले आहेत. 

दरम्यान, गेल्या अडिच महिन्यात पावसामुळे सातजणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 23 जनावरे दगावली आहेत. त्यांचे पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची प्रकिया सुरु करण्यात आली आहे. 
जिल्ह्यामध्ये नऊ ठिकाणी पुलावर पाणी आल्याने याठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची रेल्वेला गर्दी होत आहे. काही मार्गावरील बससेवाही बंद करण्यात आल्या आहेत. 

पाण्याखाली गेलेले पूल

कल्लोळ         :     येडूर (ता. चिकोडी)
कारदगा         :     भोज (ता. चिकोडी)
भोजवाडी         :     कुन्नूर (ता. चिकोडी)
सिध्दनाथ         :     अकोळ (ता. चिकोडी)
जत्राट            :          विदुशी (ता. चिकोडी)
मलिकवाड     :     दत्तवाड (ता. चिकोडी)
उगार खुर्द        :     उगार बुदुक (ता. अथणी)
कुडची         :     उगार (ता. रायबाग)
भिरडी         :     चिंचली (ता. रायबाग)