Wed, Nov 14, 2018 16:58होमपेज › Belgaon › नव्या पुलाचा पत्ता, नाला होतोय बेपत्ता!

नव्या पुलाचा पत्ता, नाला होतोय बेपत्ता!

Published On: Feb 08 2018 1:43AM | Last Updated: Feb 07 2018 10:28PMबेळगाव ः प्रतिनिधी

बेळगावातील शंभर वर्षे जुन्या रेल्वे पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. जनतेच्या वाढत्या दबावामुळे पुलाचे काम जलदगतीने होत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंनी गेलेल्या नाल्यांच्या जागांबाबत वेळीच दखल घेण्याची आवश्यकता आहे. गुडसशेड रोड येथून वाहणार्‍या नाल्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे महापालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाने पुलाचे काम हाती घेतलेल्या ठेकेदारांना योग्य त्या सूचना तत्काळ देणे आवश्यक आहे.

जुन्या रेल्वे पुलावरील वाहनांची रहदारी वाढल्यामुळे पुलाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले.पुढील काही वर्षात लोंढा ते मिरज मार्गाचे दुपदरीकरण होणार आहे, यातच या मार्गावर विद्युत इंजिन धावणार आहेत. विद्युत रेल्वे मार्गासाठी जुन्या पुलाची उंची कमी पडत असल्यामुळेच शंभर वर्षे जुना असलेला पूल पाडण्याची वेळ आली. रेल्वे खात्याने अखत्यारीतील कामांबाबत पुरेपूर दक्षता घेत नव्या पुलाचे काम सुरू केले आहे, मात्र पुलाच्या दोन्ही बाजूंनी वाहणार्‍या नाल्याच्या जागेबाबत ठेकेदाराने काळजी घेतलेली दिसत नाही.

मिलिटरी महादेव मंदिराकडून येणारा नाला रुळाखालून वाहतो. याच प्रमाणे देसाई बिल्डिंगकडून येणारा अन्य एक नालाही रुळा खालूनच वाहतो. महादेव मंदिराकडून येणारा नाला रेल्वे रुळ पार करून सहकार कॉलनी, राघवेंद्र मठ, इंद्रप्रस्थनगर, अग्निशमन दल कार्यालयामार्गे गोवावेसकडे जातो. रुळाच्या पूर्व भागातून वाहणारा नाला गुडसशेड रोड येथून पुढे मारुती मंदिराकडून शास्त्रीनगर परिसराकडे वळतो. मात्र तो नाला मारुती मंदिराकडून पुढे शेतीच्या जागेत बेपत्ता झाला आहे.