Mon, May 20, 2019 22:03होमपेज › Belgaon › बागलकोट ते खडजीदोणी मार्गावर लवकरच रेलबस

बागलकोट ते खडजीदोणी मार्गावर लवकरच रेलबस

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

विजापूर : वार्ताहर

बागलकोट - खडजीदोणी रेल्वे मार्गावर लवकरच रेल बससेवा सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक ती सर्व तयारी रेल्वे खात्याकडून यापूर्वीच करण्यात आली आहे. 70 आसनांची सोय असलेली रेलबस बसप्रमाणे असली तरी यासाठी स्वतंत्र इंजीन नसेल.

अजूनही पूर्ण न झालेल्या आणि कुडची दरम्यानच्या रेल्वेलाईनवर सुरू होणारी ही पहिलीच रेलबस सेवा आहे.    सर्वसाधारणपणे डोंगराळ भागात जेथे प्रवाशांची संख्या कमी असते, अशा भागात रेलबससेवा सुरू राहणार आहे. 20 हून अधिक डबे असलेल्या रेल्वेच्या तुलनेत काही प्रवासी वाहून  नेणारी रेलबस सेवा खात्यालाही सोयीची ठरणार आहे.

108 कि. मी. लांबीची बागलकोट -कुडची रेल्वे लाईन 800 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास थोडेच दिवस लागणार आहेत. रेलबस थांबण्यासाठी बागलकोट, नवनगर, सुळीकेरी, केरकालमट्टी, शेल्लीकेरी हे थांबे सज्ज ठेवण्यात आले आहेत. रेलबस सुरू करण्यात यावी, ही बागलकोट जिल्हाधिकार्‍यांची पूर्वीपासूनही मागणी आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल अलिकडेच बागलकोट भेटीवर आले असता त्यांनी रेलबस सेवा योजनेला मान्यता दिली होती.


  •