Sat, Jul 20, 2019 09:06होमपेज › Belgaon › मोरब येथे गावठी दारू अड्ड्यांवर छापे

मोरब येथे गावठी दारू अड्ड्यांवर छापे

Published On: Feb 24 2018 1:15AM | Last Updated: Feb 23 2018 11:38PMरायबाग : प्रतिनिधी          

रायबाग तालुक्यातील मोरब येथील 3 गावठी दारू अडड्यांवर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या (डीसीबी) नेतृत्वाखाली बुधवारी एकाचवेळी छापे घालून गावठी दारू, गूळ रसायन जप्त करण्यात आले. कारवाईवेळी गुन्हेगार पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

मोरब गावाबाहेर अड्डे तयार करून तेथे गावठी दारू तयार करण्यात येत होती. जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाला याची कुणकुण लागताच पोलिस मोरब येथे दाखल झाले. कारवाईमध्ये 80 लिटर दारू, 1380 लिटर गूळ रसायन तसेच गावठी दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारे बॅरल, प्लास्टिक घागरी जप्‍त करून नष्ट करण्यात आले. 

डीसीबीचे पोलिस निरीक्षक एस. आर. कट्टीमनी, सहकारी तसेच कुडचीचे फौजदार बसवराज लमाणी, अबकारी उपनिरीक्षक हनुमंतप्पा पटात आणि सहकार्‍यांनी ही कारवाई केली. कुडची पोलिसांनी पुढील तपास चालविला आहे.