Thu, Nov 15, 2018 01:03होमपेज › Belgaon › जैनापुरेंच्या निवासस्थानावर छापे

जैनापुरेंच्या निवासस्थानावर छापे

Published On: Mar 10 2018 2:09AM | Last Updated: Mar 10 2018 12:25AMबंगळूर/बेळगाव : प्रतिनिधी

एसीबीने एकूण 9 अधिकार्‍यांवर आज पहाटेपासून छापे घालून कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता, भूखंड-अपार्टमेंटंची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. एसीबीचे अतिरिक्‍त पोलिस महासंचालक अशोक मोहन यांनी याबाबतची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. 

राजश्री जैनापुरे यांच्या कुवेंपूनगर-बेळगाव येथील निवासस्थानासह अथणी केशवापूर येथील घर, विजापूर येथील घर तसेच कार्यालयावर पहाटे एकाचवेळी  छापे टाकण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांच्या पतीच्या दुसर्‍या घरावरही एसीबीने छापा घातला. 

एसीबीचे जिल्हा उपाधीक्षक जे. रघु यांच्यासह बंंगळूरहून आलेल्या 9 अधिकार्‍यांच्या पथकाने ही कारवाई करताना सोन्या-चांदीचे दागिने, भूखंड, जमिनीची कागदपत्रे जप्त केली. पहाटेपासून सुरू असलेली ही शोधमोहीम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. नेमकी कितीची मालमत्ता जप्त केली, याबाबत माहिती देण्यास एसीबीने नकार दिला.