Thu, Sep 20, 2018 14:57होमपेज › Belgaon › विष प्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या

विष प्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 13 2018 11:08PM

बुकमार्क करा
रायबाग : प्रतिनिधी   

 कर्जफेड करणे शक्य न झाल्याने नैराश्येतून शेतकर्‍याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना भेंडवाड (ता.रायबाग) येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. प्रकाश अडिवेप्पा बंडी (वय 28) रा. भेंडवाड असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. याप्रकरणी रायबाग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, प्रकाश याने सहकारी संघ व हातउसणे असे 2 लाखापर्यंत कर्ज घेतले होते. शेतवडीमध्ये अपेक्षेप्रमाणे पीक उत्पादन न झाल्याने कर्जाची परतफेड कशी करायची या काळजीत तो होता. प्रकाश याने गुरूवारी सायंकाळी  आपल्या शेतवडीत जाऊन कीटकनाशक घेतले. गुरुवारी रात्रीपर्यंत प्रकाश घरी परत न आल्याने घरच्यांनी त्याचा शोध चालविलेला असताना  शेतवडीमध्ये प्रकाश  मृतावस्थेत आढळून आला.