होमपेज › Belgaon › काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी बेळगावात 

काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी बेळगावात 

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 18 2018 11:34PMअंकली : प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तर कर्नाटक दौरा सुरू होणार असल्याने काँग्रेसने येत्या 24 पासून अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बेळगाव, विजापूर, बागलकोट, हुबळी दौर्‍याचे नियोजन केले आहे. काँग्रेसच्या दुसर्‍या टप्प्यातील जनाशीर्वाद यात्रेचा प्रारंभ होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी पत्रकारांना दिली. 

24 ते 26 फेब्रुवारीला राहुल गांधींनी उत्तर कर्नाटक दौरा आयोजित केला आहे. शनिवार दि.24 रोजी गांधी बेळगाव दौर्‍यावर येत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. किल्ला तलाव परिसरात उभारलेल्या भव्य ध्वजस्तंभाचे गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. नंतर सलग दोन दिवस राहुल गांधी उत्तर कर्नाटकाचा दौरा करतील. 

24 रोजी गांधी यांचा बेळगावहून प्रचारदौरा सुरू होईल. त्या दिवशी बेळगाव, चिकोडी, अथणी येथे सभा होतील, 25 रोजी विजापूर व कुडलसंगम येथे सभा होईल 26 रोजी  बागलकोट व धारवाड येथे सभा घेण्याचे ठरविण्यात आले आहे.