Fri, Jun 05, 2020 01:57होमपेज › Belgaon › खनिज लुटारूला मुख्यमंत्री करणार? 

खनिज लुटारूला मुख्यमंत्री करणार? 

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 8:58PMकोलार : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बी. एस. येडियुराप्पा यांना सत्तेवर आणण्याकरिता प्रचाराची धुरा घेतली आहे. राज्याची खनिज संपत्ती लुटलेल्या येडियुराप्पांना मुख्यमंत्री करणार का, असा बोचरा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ते सभेत ते बोलत होते.

संपूर्ण जगामध्ये इंधनाच्या किमती घसरलेल्या आहेत. परंतु भारतामध्ये त्या सर्वात जास्त आहेत. याद्वारे मिळालेला पैसा नरेंद्र मोदी देशातील बड्या उद्योगपतींना देऊन सर्वसामान्य जनतेची लूट करीत आहेत. इंधन वस्तु व सेवाकरामध्ये समाविष्ट करता येत नाही का, असा सवालही राहुल गांधी यांनी मोदींना केला.

देशातील बड्या व्यावसायिकांना कर्जमाफी दिली. कर्जबाजारी शेतकर्‍यांना कर्जमाफी का नाही? गुजरातमधील सर्व शिक्षण संस्थांचे तुम्ही खासगीकरण केल. परंतु आम्ही काँग्रेसतर्फे राज्यामध्ये मोफत शिक्षण व विद्यार्थ्यांना मोफत आहार देत आहोत. 

चार वर्षापासून तुम्ही केंद्रात सत्तेवर आहात. या कालावधीत तुम्ही कर्नाटकासाठी कोणत्या योजना राबविल्या? मुख्यमंत्रिपदासाठी तुमचे कोणत निकष आहेत. जो जास्तीत जास्त वेळा तुरुंगात गेला ती पात्रता आहे का, असा प्रश्‍नही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. घटना बदलण्याची भाषा भाजपचे आमदार करीत आहेत. तुम्ही त्यांना रोखण्यासाठी काय केले? तुम्हाला डॉ. आंबेडकरांची घटना  बदलू देणार नाही, असा इशाराही राहुल यांनी दिला. सभा आटोपल्यानंतर राहुल गांधी यांनी सायकलवर स्वार होऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.