Fri, Jan 18, 2019 01:25होमपेज › Belgaon › रामपूर येथे यात्रेनिमित्त गाढवांची शर्यत

रामपूर येथे यात्रेनिमित्त गाढवांची शर्यत

Published On: Jun 18 2018 1:09AM | Last Updated: Jun 17 2018 11:42PMजमखंडी ः वार्ताहर

बनहट्टीजवळील रामपूर येथील श्री लक्‍कव्वादेवी यात्तेनिमित्त परंपरेनुसार गाढवांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी कृष्णा नदीचे पाणी आणून मूर्तीची पद्मपूजा करण्यात आली. नंतर मूर्तीला सजविण्यात आले. 11 वा. ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला.

दुपारी बजंत्री समाजाच्या नेतृत्त्वाखाली गाढवांची शर्यत आयोजित करण्यात आली. यात नऊ गाढव सवार्‍यांची भाग घेतला. 1 कि. मी. च्या शर्यतीत सुनील बजंत्रीचे गाढव प्रथम आले. विजय बजंत्री द्वितीय, आकाश बजंत्री तृतीय तर यल्लाप्पा बजंत्री चतुर्थ आल्याने त्यांना रोख बक्षीस देण्यात आले.

या समारंभास सुरेश गोलभावी, जितेंद्र  देसाई, महादेव तळवार, ईराप्पा मुडलगी, मानिंग गोलभावी, श्रीशैल आलगूर आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे वजन वाहून नेण्याच्या स्पर्धेत 130 किलो तांदळाचे पोते 500 मीटरपर्यंत वाहून विठ्ठल तळवार याने देवीच्या चरणी अर्पण केले.