Tue, Apr 23, 2019 20:11होमपेज › Belgaon › हेल्मेट सक्‍तीबाबत निपाणीत जनजागृती रॅली

हेल्मेट सक्‍तीबाबत निपाणीत जनजागृती रॅली

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 24 2018 8:31PMनिपाणी : प्रतिनिधी

पोलिस महानिरीक्षक आलोककुमार यांनी हेल्मेट सक्‍तीचे आदेश दिले आहेत. शुक्रवारपासून निपाणी परिसरातील वाहनधारकांसाठी हा नियम लागू होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी सकाळी पोलिस व वकील संघटनेच्यावतीने शहरातून जनजागृती मोटरसायकल रॅली काढण्यात आली.

वरिष्ठ दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश राजेश्‍वरी पुराणिक व कनिष्ठ दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश देवराज वाय.एच., सीपआय किशोर भरणी यांच्या हस्ते हिरवा झेंडा व प्रबोधन फलक दाखवून रॅलीस प्रारंभ झाला. रॅलीत निपाणी सर्कलअंतर्गत येणार्‍या ग्रामीण, शहर, बसवेश्‍वर चौक, खडकलाट पोलिस स्थानकातील 100 पोलिस कर्मचार्‍यांसह वकील संघटना पदाधिकार्‍यांचा सहभाग होता.

रॅली निपाणी बसस्थानक, चिकोडी रोडमार्गे शहरातून फिरून आल्यानंतर या रॅलीची सांगता के.एल.ई. कॉलेजमध्ये झाली. सीपीआय भरणी म्हणाले, हेल्मेट सक्‍तीची अंमलबजावणी ही सर्व दुचाकीस्वारांसाठी बंधनकारक आहे. आयएसआय प्रमाणीत मार्क असलेल्या हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. याचा भंग करणार्‍यावर  दंडात्मक कारवाई केली जाईल.

वकील संघटनेच्या अध्यक्षा अ‍ॅड.अनिता सूर्यवंशी, उपाध्यक्ष आर.आर.पाटील, सचिव पी.एल.पालकर, जॉ. सेक्रेटरी ए. बी. पाटील, अ‍ॅड.आर.बी.तावदारे, अ‍ॅड. वाय. टी. संकपाळ, अ‍ॅड. निलेश हत्ती, अ‍ॅड.पी. ए. तारळे, अ‍ॅड. आर. एम. संकपाळ, अ‍ॅड.रवींद्र पाटील यांच्यासह बार असोशिएशनचे पदाधिकारी सदस्य ,पोलिस उपस्थित होते.

कॉलेजमध्येही प्रबोधन....

रॅली सांगता प्रसंगी के. एल. ई. कॉलेजमधील विद्यार्थ्यांना न्यायाधीश देवराज वाय. एच. यांनी हेल्मेट सक्‍तीबाबत मागदर्शन करून वाहतूक नियम व अटींची माहिती दिली.