Wed, Jan 16, 2019 04:48होमपेज › Belgaon › ..तर आरोप सिद्ध करून दाखवा : गाडीवड्डर

..तर आरोप सिद्ध करून दाखवा : गाडीवड्डर

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 24 2018 8:42PMनिपाणी : प्रतिनिधी

भ्रष्टाचारी लोकांनी कृती समिती स्थापन करून निपाणी पालिकेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंमत असेल तर आरोप सिद्ध करून दाखवा. अन्यथा एकाच व्यासपीठावर येऊन चर्चा करा, असे आव्हान नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी  दिले.माजी नगराध्यक्षांसह काहींनी बेळगावात नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचा आरोप करून पालिका बरखास्त करण्याची मागणी केली असल्याने त्याबाबत गाडीवड्डर बोलत होते.

गाडीवड्डर म्हणाले, आपल्यावर झालेल्या आरोपात तथ्य नाही. भ्रष्टाचार सिद्ध झाल्याशिवाय आरोप करता येत नाहीत. आरोप केलेल्यांना कामांची माहिती नाही. अशोकनगर जागाप्रश्‍नी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. जवाहरलाल तलावाशेजारी काही खासगी व्यक्‍तींनी जमिनी घेतल्या आहेत. त्यांच्याकडून सुपारी घेऊन हा आरोप केला जात आहे.नगरपालिकेने सुरू केलेल्या इंग्रजी शाळेवर आरोप करणार्‍या चंद्रहास धुमाळ यांची खासगी शाळा बंद पडते, या भीतीपोटी आणि द्वेषापोटी ते आरोप करीत आहेत. पूर्वीच्या काळी दत्त खुले नाट्यगृहात तळे होते. आता ते आम्ही पुन्हा निर्माण करून पाणी प्रश्‍नावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहोत. बाजूचे शौचालय काढले असल्याने तळ्यात स्वच्छ पाणी साठले आहे, असे ते म्हणाले. 

तळ्यासाठी 44 लाखाची तरतूद केली होती. खर्च मात्र 25 लाखाच्या  आत केला आहे. माहितीअभावी आरोप करणे बालिशपणा आहे. म्युनिसिपल हायस्कूल येथे बांधलेला कुस्ती आखाडा नव्या दगडातूनच आहे. यासाठी साडेचार लाखांचा खर्च केला आहे. उरूसानिमित्त कुस्तीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश होता, असे ते म्हणाले.यावेळी सभापती अनिस मुल्ला, रवींद्र शिंदे, बाळासाहेब देसाई, विजय शेटके, किरण कोकरे, संजय सांगावकर, जुबेर बागवान, शेरू बडेघर आदी उपस्थित होते.