Sat, Nov 17, 2018 16:57होमपेज › Belgaon › प्राध्यापकाची आत्महत्या

प्राध्यापकाची आत्महत्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव :

गुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळलेल्या प्राध्यापक रविकिरण भास्कर गदग  (वय 52) यांनी मंगळवारी सकाळी सदाशिवनगर येथील राहत्या घरी गळफासाने आत्महत्या केली. एपीएमसी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. 

प्रा. रविकिरण हे अनगोळ येथील एका नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनीअरिंग पर्यावरण विभागात कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना गुडघ्याच्या आजाराने त्रस्त केले होते. गुडघ्यातून होणार्‍या असह्य वेदानांना कंटाळून प्रा. रविकिरण यांनी आत्महत्या केली. ही घटना दुपारी त्यांच्या कुटुंबीयांच्या निर्दशनास आली.  दरम्यान, याप्रकरणी ‘एपीएमसी’ पोलिस पुढील चौकशी करत आहेत.