Wed, Nov 21, 2018 05:11होमपेज › Belgaon › प्राध्यापकांचे सहकार्य; विद्यार्थी हजेरी नगण्य

प्राध्यापकांचे सहकार्य; विद्यार्थी हजेरी नगण्य

Published On: May 05 2018 12:49AM | Last Updated: May 04 2018 11:58PMबेळगाव : प्रतिनिधी

शिक्षण खात्याने यंदा पदवीपूर्व महाविद्यालये महिनाभर अगोदर सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यावर अंमलही झाला. मात्र पहिले तीन दिवस प्राध्यापक हजर आणि विद्यार्थी नगण्य  अशीच स्थिती राहिली.

राज्यशासनाने 2014 पासून पदवीपूर्व महाविद्यालयांत विज्ञान शाखेसाठी सीबीएसर्ईचा अभ्यासक्रम सक्तीचा केला. तर 2017 पासून वाणिज्य शाखेला इकॉनॉमिक्स, अकाऊंट्स, बिझनेस स्टडीज या विषयांना सीबीएसईचा अभ्यासक्रम सक्तीचा केला. तथापि, नियमित कालावधीत हा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि दर्जेदार शिक्षणाचा विचार करून यंदा महिनाभर अगोदरच महाविद्यालये सुरू केली आहेत.

प्राध्यापकांवर वाढता ताण

21 फेब्रुवारी रोजी प्रथम वर्षाची परीक्षा संपली. 23 फेब्रुवारी ते 12 एप्रिलपर्यंत प्रथम वर्षाचे पेपर तपासणीचे काम प्राध्यापकांना करावे लागले. यानंतर प्राध्यापकांना विधानसभा निवडणुकीचे काम लागले आहे. 

पासअभावी भुर्दंड

राज्यातील काँग्रेस सरकारने निवडणुकपूर्वी वार्षिक अंदाज पत्रकात पदवीपूर्व महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत बस पासचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्य परिवहन मंडळातर्फे मे महिन्यापासूनच बस पास देण्यास असमर्थता दर्शविली आहे. परिवहन मंडळाच्या व्यवस्थापकांनी राज्याच्या मुख्य सचिव रत्नप्रभा यांना याबाबतचे पत्रही दिले आहे. या नेमक्या निर्णयाबाबत विद्यार्थी अनभिज्ञ आहेत.  पास नसल्याने सध्या 25 ते 40 कि.मी. अंतरावरून येणार्‍या विद्यार्थ्यांना रोज 50 ते 100 रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. 

‘अर्नड लीव्ह’ची तरतूद करावी

राज्य सरकारने पदवीपूर्व शिक्षण बोर्डच नॉन व्हेकेशन म्हणून जाहीर करावे आणि सरकारच्या इतर खात्याप्रमाणे वर्षाकाठी 30 अर्नड लीव्ह देण्याची व्यवस्था करावी, असे संघटनांचे म्हणणे आहे.