Sun, Aug 18, 2019 14:20होमपेज › Belgaon › प्राध्यापकांच्या सुट्टीत  15 दिवसांची कपात

प्राध्यापकांच्या सुट्टीत  15 दिवसांची कपात

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 22 2018 7:43PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यातील पदवीपूर्व महाविद्यालयांची दसरा सुट्टी कमी करण्यात आल्यानंतर आता उन्हाळी सुट्टीमध्येही 15 दिवस कपात करण्यात आली आहे. पदवीपूर्व महामंडळाच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली असून येत्या आठवड्याभरात याबाबतचा आदेश जारी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने एप्रिलपासून 31 मेपर्यंत उन्हाळी सुट्टी देण्यात येते. मात्र यावेळी 15 मे पासून महाविद्यालयांच्या शैक्षणिक सत्राला प्रारंभ होणार आहे. यावर्षी मे महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या बाबतची अधिसूचनाही लवकरच जारी होणार आहे. त्यासाठी पदवीपूर्व शिक्षण मंडळाने आणि माध्यमिक शिक्षण मंडळाने प्राथमिक स्तरापासून माध्यमिक आणि पदवीपूर्व पर्यंतच्या परीक्षा 1 महिना अगोदर घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

या सर्व पार्श्‍वभूमीवर तसेच यापूर्वी देण्यात आलेल्या काही सुट्यांच्या आणि राज्यातील आंदोलनांच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा 15 दिवस सुट्टी कमी करण्याचा निर्णय घेण्यात ला  आहे.

 

सी. सीखा, संचालिका, पदवीपूर्व शिक्षण महामंडळ

 एनसीईआरटी अभ्यासक्रम लागू झालेला असल्याने अतिरिक्त विषय तज्ञांची अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण महामंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून त्यासाठी प्राध्यपकांच्या हिवाशी सुट्टीमध्ये 15 दिवस कपात करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. याबाबत बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.