Wed, Apr 24, 2019 08:19होमपेज › Belgaon › खासगी रुग्णालये आज बंद राहणार

खासगी रुग्णालये आज बंद राहणार

Published On: Jul 28 2018 1:32AM | Last Updated: Jul 28 2018 12:09AMबेळगाव : प्रतिनिधी

इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) विविध मागण्यांसाठी शनिवारी देशव्यापी बंद पुकारला आहे. बंदमध्ये बेळगाव आयएमएचा सहभाग असून तातडीची सेवा वगळता बेळगावधील सर्व खासगी दवाखाने बंद राहतील, असे बेळगाव आयएमएच्या अध्यक्षा डॉ. सुचित्रा लाटकर यांनी कळविले आहे.

नॅशनल मेडिकल कौन्सिल विधेयकातील काही तरतुदींना आयएमएने विरोध करत सुधारणा सुचविल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. लोकसभेत पुन्हा हे विधेयक चर्चेला घेतले जाणार आहे. त्यामुळे दबाव टाकण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

यापूर्वी खासगी मेडिकल कॉलेजचे प्रवेश शुल्क सरकार ठरवत होते. त्यामुळे मेडिकलला प्रवेश घेणे मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात होते. मात्र नव्या विधेयकाला जशीच्या तशी  मंजुरी मिळाल्यास खासगी मेडिकल कॉलेजच्या प्रवेश शुल्कावरील सरकारचे नियंत्रण हटणार आहे. परिणामी खासगी कॉलेज अव्वाच्या सव्वा फी आकारली जाण्याची भीती आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राचा दर्जा घसरुन, जे श्रीमंत तेच फक्त मेडिकल शिक्षण घेतील, त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतील, असे आयएमएचे म्हणणे आहे. याला विरोध म्हणून देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. अपघात तसेच आपत्कालीन सेवा सुरु असेल. सहकार्य करण्याचे आवाहन  आयएमए अध्यक्षा डॉ. लाटकर यांनी केले आहे.