Wed, Nov 14, 2018 21:28होमपेज › Belgaon › जिल्ह्यातील खासगी रुग्णालये बंद

जिल्ह्यातील खासगी रुग्णालये बंद

Published On: Jul 29 2018 1:20AM | Last Updated: Jul 29 2018 12:33AMबेळगाव : प्रतिनिधी

इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध डावलून केंद्र शासनाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालय बंद ठेवण्यात आली.  दरम्यान, याची पूर्वसूचना देण्यात आल्याने आणि तातडीची रुग्णसेवा सुरु राहिल्याने रुग्णांची कोणतही गैरसोय झाली नसल्याची माहिती बेळगाव मेडिकल असोसिएशनचे अध्यक्षा सुचित्रा लाटकर यांनी दिली. 

केंद्र शासनाने इंडियन मेडिकल असोसिएशन आणि डॉक्टरांचा विरोध डावलून वैद्यकीय आयोग विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खासगी वैद्यकीय कॉलेजला सर्व अधिकार प्राप्त होणार आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालय कोणीही नियम न पाळता काढू शकणार आहे. खासगी मेडिकल कॉलेजवरील सरकाराचे नियंत्रण कमी झाल्यास ते भरमसाठ शुल्क आकारुन विद्यार्थ्यांना प्रवेश देतील. त्याचबरोबर यामुळे वैद्यकीय शिक्षण हे मेरिटवर न राहता श्रीमंतांची मक्तेदारी होणार आहे. हा प्रकार देशासाठी आणि रुग्णासाठी घातक ठरणार आहे. याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला.

शहर परिसरातील सुमारे तीनशे तर बेळगाव जिल्ह्यतील सुमारे सातशे खासगी रुग्णालये बंद राहिली. डॉक्टरांनी संपाची पूर्वमाहिती दिली होती. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात आजच्या बंदचे फलक लावण्यात आले होते. तातडीची रुग्णसेवा सुरुच राहिल्याने रुग्णांचे  हाल झाले नाहीत. यावेळी डॉ. पी. एस. तेजस्वी, डॉ. संतोष शिंदे, डॉ. सुनील जोशी, डॉ. मिलिंद हलगेकर आदी उपस्थित होते.