Sat, Feb 16, 2019 11:01होमपेज › Belgaon › सत्तेआधीच ‘दलित मुख्यमंत्री’ मुद्द्यावरून काँग्रेस पक्षात वाद

सत्तेआधीच ‘दलित मुख्यमंत्री’ मुद्द्यावरून काँग्रेस पक्षात वाद

Published On: May 14 2018 1:42AM | Last Updated: May 14 2018 12:30AMबंगळूर : प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक निकाल मंगळवारी (दि. 15) जाहीर होणार असला, तरी त्याआधीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण झाला आहे. दलित नेत्याला मुख्यमंत्रिपद देण्याबाबतच्या जुन्या मागणीचा विषय आता चर्चेला आला  आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारकाळात काँग्रेसवर दलिताला मुख्यमंत्री न केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासंदर्भात केला होता. त्या आरोपावरून आता काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू झाला आहे.

मुख्यमंत्रिपद पात्रतेवरून मिळावे, मी दलित आहे म्हणून नव्हे, असे खर्गे यांनी म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ. जी. परमेश्‍वर यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबत कार्यकर्त्यांनी आंदोलने केली होती. मात्र, वरिष्ठांनी उपमुख्यमंत्रिपदाला विरोध करून परमेश्‍वर यांची समजूत घातली. त्यानंतर तो वाद शमला होतो. आता काँग्रेसला सत्ता मिळाली, तर हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.