Mon, May 20, 2019 18:14होमपेज › Belgaon › पंतप्रधान नरेंद्र मोदी १ मे रोजी बेळगावात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी १ मे रोजी बेळगावात?

Published On: Apr 24 2018 1:05AM | Last Updated: Apr 24 2018 12:48AMबंगळूर : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ते 8 मे पर्यंत राज्याच्या विविध भागात दौरा करणार असून 15 स्थळांवर त्यांच्या जाहीर सभा होणार असल्याचे पक्षाचा सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 

1 मे रोजी बेळगाव, उडपी, चामराजपेठ, दि.3 रोजी गुलबर्गा, बळ्ळारी, बंगळूर. दि. 5 रोजी हुबळी, तुमकूर, शिमोगा, दि.7 रोजी रायचूर, चित्रदुर्ग व कोलार व दि. 8 रोजी विजापूर, मंगळूर व बंगळूरमध्ये जाहीर सभा होईल. दौर्‍याच्या तारखेत बदल होऊ शकेल, असेही भाजपच्या सूत्रांनी म्हटले आहे.

राहुल गांधी 26 पासून 

राज्यात जनाशिर्वाद यात्रा आटोपून राजधानी दिल्लीकडे परतलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आता पुन्हा जाहीर सभेच्या निमित्ताने कर्नाटकाच्या दौर्‍यावर येत आहेत. दि.26 पासून त्यांच्या दौर्‍याला प्रारंभ होत आहे. दि.26 रोजी सकाळी 11.45 वा. अंकोल येथील जय हिंद स्कूल मैदानावरील हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल.

 

Tags : belgaon, belgaon news, Karnataka Assembly Elections,  Narendra Modi, belgaon,