होमपेज › Belgaon › पंतप्रधान नरेंद्र मोदी १ मे रोजी चिकोडीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी १ मे रोजी चिकोडीत

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 26 2018 12:53AMचिकोडी: प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर  उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य सभेचे दि. 1 मे रोजी सायं.  4  वा.  चिकोडीत आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे पत्रकार परिषदेत  दिली.

ते म्हणाले, शहरातील बी. के. महाविद्यालयाच्या मागे, केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयानजीकच्या खुल्या जागेसह तीन ठिकाणांची सभेसाठी निवड करण्यात येणार आहे. यासाठी गुरुवारी सुरक्षा एक्स्पर्ट चिकोडीत येऊन जागेची पाहणी करणार आहेत. या सभेस केंद्रातील अनेक मंत्री, नेत्यांसह राज्यातील नेते उपस्थित राहणार असून 1 लाखाहून अधिक नागरिक उपस्थित राहणार आहेत.

राज्यात विधानसभेच्या प्रचारासाठी 14 ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा होणार आहेत.यावेळी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी खासदार अमरसिंह पाटील, दूधगंगा कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष अमित कोरे, नागेश किवड, प्रकाश काटे, भरतेश बनवणे, अक्रम अरकाटे आदी उपस्थित होते.