Fri, Jul 19, 2019 07:52होमपेज › Belgaon › कर्नाटकला करा काँग्रेसमुक्‍त

कर्नाटकला करा काँग्रेसमुक्‍त

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 12:42AMबेळगाव : प्रतिनिधी

देशात भाजप सरकार आल्यापासून देश टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून विकासाच्या शिखराकडे वाटचाल करत आहे. सर्व व्यवहार ऑनलाईन झाल्याने आता लाभधारकाच्या खात्यात थेट रक्‍कम जमा होत आहे. कर्नाटकात बेळगाव शहरासह सहा जिल्हे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास करण्यासाठी 836 कोटी रुपये मंजूर केले. तरीही कर्नाटक सरकारला केंद्र सरकारच्या निधीपैकी केवळ 12 कोटी अनुदानाचा उपयोग करता आला. अशा सरकारला येत्या निवडणुकीतून हद्दपार करीत कर्नाटक काँग्रेसमुक्‍त करा, असे आवाहन पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

बुधवारी जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेसच्या प्रचारसभेतदेखील नरेंद्र मोदी हेच नाव येते. कारण, कधी तरी खरे बोलण्याची सद्बुद्धी देव सार्‍यांनाच देतो. 2022 पर्यंत प्रत्येकाच्या मालकीचे घर असावे, हे भाजपचे उद्दिष्ट आहे. स्वच्छ भारत योजनेंतर्गत 7 कोटींपेक्षा जादा शौचालय, 29 कोटी रुपये प्रधानमंत्री योजनेतून कर्ज वाटप, 12 कोटी रुपये नवयुवकांना मुद्रा कर्ज वितरण, 90 पैशांत जीवन विमा योजना, 19 करोड लोकांना त्याचा लाभ, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 300 योजनांना चालना, उमंग अ‍ॅप मोबाईलमधून 200 सेवा देण्याचे काम भाजपने केले आहे. 

देशातील रेल्वेच्या वातानुकूलीत डब्यातून जेवढे प्रवासी प्रवास करीत नाहीत, त्यापेक्षा जादा प्रवास विमानातून भारतीय करीत आहेत. ही प्रगती नाही का? त्यासाठी घराघरात जावून भाजपचा प्रचार करा. या वेळेला भाजपचे कमळ फुलवा, असे आवाहनही मोदींनी केली. मोदींचे संध्याकाळी ठीक 5:20 ला आगमन झाले. 5:25 भाषणाला सुरुवात झाली. भाषण  6:05 मिनिटला संपल्यानंतर लागलीच मोदी हेलिकॉप्टरने गोकाकला रवाना झाले.

प्रचारसभेला खासदार सुरेश अंगडी, खासदार डॉ. प्रभाकर कोरे, उमेदवार अ‍ॅड. अनिल बेनके, संजय पाटील, अभय पाटील, विठ्ठल हलगेकर, भाजप जिल्हाध्यक्ष विश्वनाथ पाटील, आनंद मामणी, महांतेश कवठगीमठ, भालचंद्र जारकीहोळी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन इराण्णा कडाडी व दीपक जमखंडी यानी केले.  

सुरुवात कन्नडमधून

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात कन्नडमधून केली. बेळगावचा कुंदानगरी असा उल्लेख करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, बेळवड्डी मल्लम्मा, कित्तूर राणी चन्नमा, संगोळी रायण्णा यांचा जयजयकार केला.